Breaking News

साईनाथ कर्मचारी संस्थेच्या चौकशीचे आदेश


निमगाव कोऱ्हाळे येथील साईसंस्थान कामगारांची साईनाथ कर्मचारी सहकारी या संस्थेत २०१० सालापासून सुरु असलेल्या गैरकारभाराच्या चौकशीचे आदेश सहकार मंत्रालयाकडून पुण्याच्या सहकार आयुक्तांना देण्यात आले आहेत. 

या गैरकारभाराबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते सुनील निकम यांनी माहिती मागितली होती. या संस्थेची जमीन विक्री करण्यासाठी जिल्हा उपनिबंधकाची परवानगी न घेणे, मनमानी कारभार असे आरोप करण्यात आले आहेत. दरम्यान, या संस्थेत झालेल्या गैरव्यवहाराबाबत चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत फायनान्स कंपनीने दिलेल्या कर्जाची सभासदांकडून वसूली करू नये, यासाठी राज्याचे मुख्यमंत्री व सहकार मंत्री यांच्याकडे मोठा पाठपुरावा केला होता. त्यात सर्व प्रकरणाची चौकशी करून दोषी संचालकावर कारवाई बाबत मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर अर्जाचे सहकार व पणन विभागाने गंभीर दखल घेऊन पत्र {क्र.२०१८ यादी क्र.१४ ६ } देण्यात आले. मार्चमध्ये देण्यात आलेल्या या पत्रानुसार सहकार आयुक्त निबंधक सहकारी संस्था पुणे यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यात तक्रारदार सुनील निकम यांनी केलेल्या संस्थेच्या तक्रारी मागणी विविध मुद्दे आवश्यक चौकशी करावी तसेच महाराष्ट्र संस्था अधिनियम १९६० व १९६१ व संस्थेची मंजूर उपविधी आणि तरतुदी शासन नियम परिपत्रक नुसार उचित कारवाई करण्यात यावी. त्याचप्रमाणे या चौकशीची आणि कारवाईची माहिती अर्जदाराला कळवावी, असे या आदेशात म्हटले आहे. याबाबत एका संचालकाशी संपर्क साधला असता त्यांनी कुठललीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.