Breaking News

सतत पॉर्न फिल्म बघणाऱ्या मुलाने आईवरच केला बलात्कार.


आई-मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी व अतिशय धक्कादायक अशी घटना पालनपूरच्या पाटण शहरात घडली. पॉर्न फिल्म सतत बघणाऱ्या २२ वर्षांच्या मुलाने आपल्याच आईवर बलात्कार केला. त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
गुरुवारी रात्री आई झोपलेली असताना आईच्या खोलीत जाऊन हे भयानक व घृणास्पद कृत्य या मुलाने केले. पाणी पिण्याच्या नावाखाली तो आईच्या खोलीत गेला व त्याने हे कृत्य केले. रात्री एक वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला तेव्हा आईने आरडाओरडाही केला. मात्र, मुलाबरोबर होणाऱ्या नेहमीच्या भांडणाचा हा प्रकार असेल म्हणून कोणी शेजारीही धावून आले नाहीत. पोलिसांनी दिलेल्या मिाहतीनुसार या मुलाला रात्री उशिरापर्यंत मोबाइलवर अश्लील फिल्म्स पाहण्याचा नाद होता. 

जणू ते व्यसनच त्याला जडले होते. आपली आई व २० वर्षांची बहीणही समोर असली तरीही तो असले प्रकार करत असे. याबाबत याआधीही मुलाबद्दल आईने तक्रार केली होती. त्याने आईला या आधीही लैंगिक सुखाबाबत विचारणा केली होती. यामुळे आई प्रचंड मानसिक धक्क्याने कोलमडली असून, तिने यापूर्वी नवऱ्यालाही याबाबत सांगितले होते. तिचा नवरा गवंडी काम करणारा आहे. त्याने आपल्या मोठ्या मुलाला अहमदाबादमध्ये हा प्रकार सांगितल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे या प्रकाराबाबत तक्रार केली.