Breaking News

आंतरराष्ट्रीय शॉर्टफिल्म फेस्टीव्हलचे आयोजन


सोलापूर, प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या जयंतीनिमित्त अकलूजमध्ये 24 आणि 25 जून रोजी लोकनेते प्रतापसिंह मोहितेपाटील इंटरनॅशलन शॉर्ट फेस्टीव्हलचे डॉ. धवलसिंह मोहितेपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्ण्यात आले आहे. या फेस्टीव्हलमध्ये 30 देशातील लघुपट सहभागी होती अशी माहिती माणिकराव मिसाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

दोन दिवसात 30 बेस्ट फिल्म दाखविण्यात येतील. स्क्रिनिंग करण्यात आलेल्या प्रत्येक फिल्मला सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देण्यात येणार आहे. प्रथम क्रमांकास एक लाख रूपये, व्दितीय क्रमांकास 51 हजार रूपये आणि तृतीय क्रमांकास 21 हजार रूपयाचे पारितोषिकां व्यतिरिक्त बेस्ट अ‍ॅक्टर, बेस्ट अ‍ॅक्ट्रेस , बेस्ट दिग्दर्शक, कॅमेरामन, संकलक, प्रेक्षक चाईस बेस्ट फिल्म यांना पा रितोषिके दिली जाणार आहेत. स्पर्धेसाठी विषयांचे बंधन नाही. लघुपटाचा वेळ 1 ते 30 मिनिटापर्यंत असेल. फेस्टीव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी 25 ते 30 एप्रिल असा कालावधी राहणार आहे.