Breaking News

जेउरकुंभारीच्या सामाजिक सभागृहाचे लोकार्पण


कोेपरगांव:  तालुक्यातील जेउरकुंभारी ग्रामपंचायतीने संजयनगर भागात अनुसुचित जाती नवबौध्द घटक वस्ती विकास योजनेअंतर्गत नव्याने बांधलेल्या सामाजिक सभागृहाचे लोकार्पण डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी आ. स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले. 

जिल्हा रिपाई उत्तर नगरचे जिल्हाध्यक्ष दिपक गायकवाड यांनी प्रास्तविक केले. याप्रसंगी पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव, साहेबराव कडनोर, माजी सभापती शिवाजीराव वक्ते, भाजपाच्या महिला अध्यक्षा योगिता होन, तालुकाध्यक्ष शरद थोरात, संजीवनीचे माजी उपाध्यक्ष सुभाषराव आव्हाड, माजी संचालक मधुकरराव वक्ते, बाळासाहेब वक्ते, भिमराज वक्ते, शिवाजीराव वक्ते, सोपानराव खरात, आनंदा चव्हाण, बाळासाहेब गायकवाड आदींसह जेउरकुंभारी पंचक्रोषीतील महिला भगिनी आणि कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. ग्रामसेवक के. बी. रणछोड यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन करून आभार मानले.