Breaking News

भारतीय कामगार सेनेच्या महाराष्ट्र प्रदेश सदस्यपदी ज्ञानेश्‍वर पवार


राहाता, मुंबई बांद्रा येथिल रंगशारदा सभागृहात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, भारतीय कामगार सेना अध्यक्ष सूर्यकांत महाडिक, भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक, मुंबईचे महापौर आदी प्रमुख मान्यवरांचे उपस्थितीत भारतीय कामगार सेनेची वार्षिक सभा संपन्न झाली. यावेळी संघटनेच्या प्रदेश सदस्य पदाच्या नियुक्ती करण्यात आल्या. 

कामगार सेनेचे शिर्डी शहराध्यक्ष ज्ञानेश्‍वर पवार यांची भारतीय कामगार सेनेच्या महाराष्ट्र प्रदेश सदस्य पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे शिर्डी येथिल पंचतारांकित हॉटेल सन एन सॅन्ड च्या कामगार सेनेच्या सभासद पदाधिकारी तसेच साईनिर्माण ग्रुपचे अध्यक्ष विजयराव कोते ग्रुपचे सर्व सदस्य विविध सामाजिक आदींनी अभिनंदन केले.