Breaking News

१६ वर्षीय अल्पवयीन मुलीला उचलुन नेल्याची घटना


राहुरी तालुक्यातील बारागाव नांदुर येथिल अट्टल गुन्हेगार व वाळु तस्कराकडुन १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला वडिला देखत मुलगी झोपेत असतांना चारचाकी वाहनात उचलुन नेल्याची घटना मधेरात्री घडल्याने बा. नांदुर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.या घटनेवरुन राहुरी पोलिस ठाण्यात मुलीचे वडिल विलास नामदेव पवार वय वर्ष ३५राहणार बा. नांदुर यांनी गुन्हा रजि नंबर २२०|\२०१८भादवी कलम ३६३\३६६\अ प्रमाणे अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुलगी मिळुन आल्यावर या आरोपीवर अत्याचार व बाल लैगिग कायद्या प्रमाणे गुन्हा दाखल होवु शकतो,राहुरी तालुक्यातील बा.नांदुर परिसरात एका घरासमोर १६.वर्षीय अल्पवयीन मुलगी रात्री आई शेजारी झोपली असता मधेरात्री २वाजे दरम्यान येथिलच अट्टल गुन्हेगार व वाळु तस्कर किशोर साहेबराव माळी व संजय भगवान बर्डे यासह अज्ञात तिण जणांनी अल्पवयीन मुलीस पळवले नेले पळवुन नेत असतांना मुलीच्या वडिलांनी किशोर /संजय व तिन इसम चारचाकी काळ्या रंगाच्या गाडीत मुलीला टाकत असतांनी बघितले मुलीच्या वडिलांनी आरड ओरड केली असता मुलीला चार चाकी वाहनात घेवुन आंधारात पसार झाले आहे.अल्पवयीन मुलीला पळवुन नेणारा किशोर माळी हा अट्टल गुन्हेगार व वाळु तस्कर असुन त्याच्यावर राहुरी पोलिसात गुन्हे दाखल आहेत त्याने अनेक अल्पवयीन मुलींना पळवुन नेत अत्याचार केल्याचे नागरीकांनमधुन बोलले जात आहे.नागरीकानकडुन समजलेल्या माहिती नुसार किशोर माळी व त्याच्या साथीदाराने या अल्पवयीन मुलीस दोन दिवसापुर्वी पळवुन नेले आहे.तसेच मुलीच्या वडिलाने किशोर माळीशी संपर्क करत आमची मुलगी आम्हाला परत द्या अशी विनवनी केली पण माळी याने माझे काम झाल्यावर मुलीला पाठवुन देईल जर तु कोणाशी काही बोलला तर मुलगी दिसणार नसल्याची धमकी दिल्याचे चर्चातुन समजले आहे. सदर प्रकार नुकताच गाजलेला रावडी राठोड या चित्रपटाला शोभेल असा दिसुन येत आहे.अद्याप मुलगी परत मिळाली नसल्याने मुलीचे आई वडिल हवालदिल झाले आहेत.

सदर घटना घडल्याने या भागात अल्पवयीन मुलींच्या सुरक्षाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे,या गुन्हेचा तपास पोलिस ठाण्याचे सहय्यक पोलिस निरिक्षक दिलीप राठोड करत असुन आरोपीच्या लवकरच मुसक्या आवळणार असल्याचे तपासी अधिकारी राठोड यांनी सांगितले.