Breaking News

आगामी निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची युती खा. प्रफुल्ल पटेल

गोंदिया : आगामी विधानसभा निवडणुका लढविण्यासाठी राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रसची युती होणार आहे. त्यामुळे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी युतीचाच विजय होणार असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रसचे नेते खा. प्रफुल्ल पटेल यांनी केले. ते शहरात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.
प्रफुल्ल पटेल म्हणाले की, नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन्ही नेते विदर्भातील असून सुद्धा त्यांनी विदर्भासाठी कोणतेही महत्वाचे विकास काम केले नाही. तरुणांच्या रोजगाराचा प्रश्‍न सोडवला नसल्याची आरोप त्यांनी यावेळी केला. तसेच राज्यात सध्या भाजपविरोधी वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे राज्यात काँग्रेस आणि राष्ट ्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष युती करून विधानसभेच्या आगामी निवडणुका लढवणार असल्याचे सांगितले. तसेच आम्ही निश्‍चित विजयी होऊ, असा विश्‍वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. गोंदिया-भंडारा या लोकसभेच्या मतदार संघाची पोट निवडणूक होण्याची शक्यता आहे. ही निवडणूक देखील काँग्रेससोबत युती करूनच लढणार असल्याचे पटेल म्हणाले. तसेच मी स्वत: ही पोटनिवडणूक लढणार नसल्याचे ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.