Breaking News

हरणाच्या धडकेत दुचाकीचालक जखमी

शिर्डी / प्रतिनिधी - गणेश सहकारी साखर कारखान्याचे कर्मचारी महेश कुलकर्णी हे शिर्डीमार्गे पुणतांबा येथे घराकडे जात होते. तेवढ्यात पिंपळवाडी शिवारात निवारा हौसिंग सोसायटीसमोर एक हरीण त्यांच्या दुचाकीला आडवे आले. त्यामुळे कुलकर्णी रस्त्यावर पडून जखमी झाले.

उन्हाळा तीव्र असल्यामुळे पाण्याच्या शोधात ही हरणे कधीकधी रस्त्यावरही येतात. पाण्याच्या शोधात पळताना हरणांचा वेग भरधाव असतो. त्यातूनच ही घटना घडली. मार लागल्यानंतर कुलकर्णी यांना उपचारासाठी साईबाबा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या अपघातात त्यांच्या हात आणि पायाला मार लागला होता. या घटनेत हरणाला मात्र कुठलीही इजा झाली नाही.