Breaking News

नेवासा तहसील कचेरीवर मुक मोर्चा

नेवासा ( शहर प्रतिनिधी )- नेवासा येथे जम्मू काश्मीर, उत्तर प्रदेश व गुजरात येथे झालेल्या बलात्कार व खुनाच्या घटनेचा निषेध करत तहसील कचेरीवर मुकमोर्चा काढत सर्वधर्मीयांच्या वतीने तिव्र निषेध करण्यात आला. सोमवार दि.16 एप्रिल रोजी सर्व धर्मीय, सर्वपक्षीय पदाधिकारी व नागरिक खोलेश्‍वर मंदिर चौकात सकाळी 11 वाजता एकत्र आले. हाताला काळ्या फिती लावून वरील तिन्ही ठिकाणी झालेल्या घटनेचा निषेध नोंदवित मुकमोर्चा तहसील कचेरीवर पोहचला. उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील, रम्हुशेठ पठाण, महेश मापारी यांनी वरील घटनेतील आरोपींनी माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य केले असल्याने त्यांना कठोर शासन करण्यात येऊन फाशी देण्यात यावी अशी मागणी केली. सदरचे निवेदन उमेश पाटील, पोलीस निरीक्षक प्रविण लोखंडे यांना देण्यात आले. या मुकमोर्चात सतीश पिंपळे, जितेंद्र कुर्‍हे , संभाजी पवार, लक्ष्मण जगताप, राजेंद्र मापारी, दत्तात्रय बर्डे, सचिन वडागळे, फारूक आतार, संदीप बेहळे, दिनेश व्यवहारे, रणजित सोनवणे,भारत डोकडे,अंबादास इरले, सचिन नागपुरे अँड.काका गायके जुम्माभाई पठाण,रहेमानभाई पिंजारी,जम्मा पटेल,शफीक शेख,बाबर,पठाण,इलियास पठाण, नवाब बागवान,ईसुफ बागवान, दादासाहेब गंडाळ,अनिल बोरकर,प्रकाश सोनटक्के, राजेंद्र उंदरे,अभिजित मापारी,इस्माईल जहागीरदार, अँड.अय्याज पठाण,एजाज पटेल,असिर पठाण,मुन्ना शेख,मुक्तारभाई शेख,प्रविण सरोदे,पंकज जेधे,समीर फिटर,बंटी वाघ,समीर सय्यद,मुन्ना आतार,प्रमोद चक्रनारायण, सोहेल सय्यद,असिफ मॅटर,संजू पवार,आकाश एरंडे यांचे सह सर्व धर्मीय नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.