Breaking News

ओझर खुर्दला त्रिदिनी सप्ताहाचे आयोजन


आश्वी : संगमनेर तालुक्यातील ओझर खुर्द येथे समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांच्या मार्गदर्शनाखाली तीन दिवसीय {त्रिदिनी} सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती हभप नारायण महाराज थोरात यांनी दिली. 

कालपासून {दि. १७ } या सप्ताहाला प्रारंभ झाला. सायंकाळी हभप बाळासाहेब महाराज उंबरकर यांचे प्रवचन झाले. दरम्यान, आज {बुधवार} चंद्रकांत कावळे व मिराताई कावळे यांचे यांचे जागरण गोधंळ व गुरुवारी हभप दयानंद महाराज कोरेगावकर यांचे सुश्राव किर्तन होणार आहे. त्यानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे. या सप्ताह सोहळ्याचा ओझर ग्रामस्थ व पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर), हभप शालिनीताई देशमुख, हभप नारायण महाराज थोरात यांनी केले आहे.