Breaking News

गाडेंनी प्रामाणिक सेवेतून विद्यार्थी घडविले : विखे

आश्वी : प्रतिनिधी - पद्मभूषण स्व. बाळासाहेब विखे पाटील यांनी ग्रामीण भागातील शिक्षणाची गरज ओळखून पिप्रीं-लौकी आजमपूर येथे शाळा सुरु केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक भाऊसाहेब गाडे यांनी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मध्यमातून विविध गावांमधील शाळेत प्रामाणिक सेवा केली. य सेवेतून भविष्यातील विद्यार्थी घडवण्याचे काम केले, असे गौरवोदगार जिल्हापरिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे यांनी काढले.

संगमनेर तालुक्यातील पिप्रीं-लौकी आजमपूर येथील प्रवरा माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक भाऊसाहेब बाबुराव गाडे यांच्या सेवापूर्ती कृतज्ञता समारंभात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी भाऊसाहेब मुंढे होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णासाहेब भोसले, जिल्हापरिषद सदस्या अँड. रोहिणी निघुते, संचालक प्रतापराव तांबे, देविचंद तांबे, डॉ. हरिभाऊ तांबे, माजी प्राचार्य विठ्ठल वर्पे, अँड. पोपटराव वाणी, भाऊसाहेब लावरे, विजय आहेर, सरपंच अलका गिते, शिक्षणाधिकारी रेटरेकर, विठ्ठल गायकवाड, भारत गिते, सुखदेव गिते, गोकुळ गिते, दादाहरी गिते आदी उपस्थित होते. यावेळी मुख्याध्यापक भाऊसाहेब गाडे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. 

विखे म्हणाल्या, पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी साखर कारखाना ऊभा केला नसता तर प्रवरा शिक्षण संस्थेचा वटवृक्ष झाला नसता. पूर्वीच्या काळी विद्यार्थ्यांमध्ये शिक्षकांविषयी आदरयुक्त धाक होता. परंतू आता शिक्षक हे विद्यार्थ्यांना घाबरत आहेत. शिक्षकांनी घराच्या भांडणाचा राग शाळेपर्यत आणू नये. भारत गिते यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन शिक्षक वाणी यांनी केले. शिक्षक खर्डे यांनी आभार मानले आहेत.