Breaking News

संशय घेत अल्पवयीन पित्याकडून चिमुकल्याची हत्या


पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत एका १७ वर्षीय पतीने आपल्या दोन महिन्यांच्या चिमुकल्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना दिल्लीबाहेरच्या भागात घडली. मुलगा आपला नसल्याच्या संशयावरून त्याने त्याची हत्या केली. या प्रकरणात पत्नीदेखील अल्पवयीन असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.दिल्लीबाहेरील मंगोलपुरी भागात शनिवारी सायंकाळी काळजाचा थरकाप उडविणारी ही घटना घडली. पत्नीचे अवैध संबंध असल्यावरून पतीने आपल्या बाळाची निघृर्ण हत्या केली. बाळाची आईदेखील अल्पवयीन आहे. दहा महिन्यांपूर्वी दोघांचा विवाह झाला होता, असे पोलिसांनी सांगितले. हत्येच्या वेळी पत्नी नोकरीच्या शोधात पालिका बाजारामध्ये गेली होती. घरी परतल्यानंतर तिला बाळ गंभीर अवस्थेत पडलेले दिसले. तिचा नवरा त्यावेळी घरी नव्हता. यानंतर तिने बाळाला तातडीने रुग्णालयात दाखल केले; परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.