Breaking News

पाथर्डीत संतधाम विठ्ठल-रुख्मिणी मंदिर शिखरावर सुवर्ण कलशारोहण


पाथर्डी (शहर प्रतिनिधी) - शहरातील शंकर नगर भागातील संतधाम टेकडीवरील संतांच्या तसेच कैकाडी समाजाचे दैवत संत कैकाडी महाराज, कानिफनाथ व विठ्ठल रुखामिनी मंदिराच्या शिखरावर मोठ्या उत्साहात सुवर्ण कालाशारोहन करण्यात आले. येळेश्‍वर संस्थांनचे महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते विधिवत महापूजा करून सुवर्ण कलशारोहण सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात हरिनामाच्या जयघोषात संपन्न झाला. संतधाम टेकडीवर कैकाडी समाजाचे श्री क्षेत्र मढी येथील कानिफनाथ यात्रेच्या मनाच्या काठीचे मुख्य मानकरी नारायणबाबा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विश्‍वस्त मंडळाने मंदिर व परीसरचा कायापालट केला आहे.मंदिर शिखराचे काम पूर्ण झाल्यामुळे या शिखरावरती सुवर्ण कालाशारोहन येळेश्‍वर संस्थानाचे महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते विधिवत महापूजा करून करण्यात आले. त्यामुळे येथील वातावरण अगदी प्रसन्न वाटत आहे. नैसर्गिक आणि धार्मिक वातावरणाने मंदिर परिसरात नवचैतन्य पसरले आहे. मात्र काही प्रमाणात मंदिराचे काम बाकी असल्याने भाविकांनी सहकार्य करण्याचे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष नारायणबाबा जाधव यांनी केले. या कलशारोहण सोहळ्याप्रसंगी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष नारायणबाबा जाधव, निवृत्ती महाराज भडके, गहिनीनाथ खेडकर, अर्जुन भडके, बाबा महाराज कोलते, राजू जाधव, गणेश जाधव, आकाश जाधव, अशोक जाधव, यशवंत जाधव, मल्हारी गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, संतोष जाधव, अंबादास जाधव, चत्रभुज राऊत आदींची उपस्थिती होती.