Breaking News

प्रेरणादायी कार्याद्वारे युवकांना दिशा द्या : डॉ. विखे

राहाता. दि प्रतिनीधी - चढाओढ आणि स्पर्धा करून महापुरुषांचे जयंती सोहळे साजऱ्या करण्यापेक्षा जात धर्म न मानता गावागावात शांततेत व डीजेमुक्त वातावरणात आणि सामाजिक एकोप्यामध्ये प्रत्येक महापुरुषांची जयंती साजरी करा. याप्रसंगी समाजातील चांगल्या व आदर्श काम करणाऱ्या व्यक्तींमत्वांचा गौरव करून त्यांचे प्रेरणादायी कार्य समाजासमोर आणत सर्वच युवकांना दिशा द्या, असे आवाहन युवा नेते डाॅ. सुजय विखे यांनी केले.

भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राहाता शहरात डाॅ. विखे यांच्या हस्ते डाॅ. आंबेडकरांच्या पुतळ्याचे पुजन करून जयंती उत्सव साजरा करण्‍यात आला. अध्यक्षस्थानी अॅड. रघुनाथ बोठे होते. अॅड. नारायण कार्ले, नायब तहसीलदार राहुल कोताडे, मोहन सदाफळ, माजी नगराध्यक्षा विद्या शिंदे, नगरसेविका सविता सदाफळ, विनायक निकाळे, माजी नगराध्यक्ष कैलासबापू सदाफळ, सोपान सदाफळ, विरभद्र महाराज ट्रस्टचे अध्यक्ष सागर सदाफळ, प्राचार्य राजेंद्र बर्डे, ज्येष्ठ पत्रकार सतिष वैजापूरकर, डाॅ. बापूसाहेब पानगव्हाणे, पंकज पिपाडा, मोहम्मद सय्यद, हाजी मुन्ना शाह, मुजिब शाह, सुभाष गाडेकर, भगवान डांगे, स्वप्निल गाडेकर, प्रा. राजेंद्र निकाळे, डाॅ. किरण गोरे, प्रदिप बनसोडे, राजेंद्र पाळंदे, राजेंद्र अग्रवाल, नगरसेवक विजय बोरकर, नगरसेवक भिमराज निकाळे, नगरसेविका अनुराधा तुपे, मनिषा बोठे, सविता सदाफळ, दशरथ गव्हाणे, दशरथ तुपे, सुनिता टाक, राजेंद्र पाळंदे, अॅड. बी. ए. हुसळे, वसंत खरात, अरुण वाघमारे, रविंद्र कटारनवरे, एकनाथ धिवर आदी प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

डाॅ. विखे म्हणाले, भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आचार विचाराची प्रत्येकाला गरज आहे. त्यासाठी आपण महापुरुषांची पुस्तके वाचणे गरजेचे आहे. आज अनेक गावे व शहरातील महापुरुषांचे जयंती उत्सव शांततेत साजरे करण्यापेक्षा युवकांमध्ये चढाओढ व स्पर्धा सुरु आहे. ही स्पर्धा कुठेतरी थांबली पाहिजे. प्रत्येक महापुरुषांची जयंती डीजेच्या धागंडधिग्यात साजरी करण्याऐवजी शांततेत व डीजेमुक्त वातावरणात साजरी कराव्यात. याप्रसंगी माजी नगराध्यक्षा विद्या शिंदे, अॅड. रघुनाथ बोठे, अॅड. नारायण कार्ले, पत्रकार सतिष वैजापूरकर, दशरथ गव्हाणे आदींनी मनोगत व्यक्त कले. प्रारंभी विनायक निकाळे प्रास्ताविक केले, सूत्रसंचालन प्रा. राजेंद्र निकाळे यांनी केले. नगरसेवक भिमराज निकाळे यांनी आभार मानले.