Breaking News

मालगाडीच्या धडकेत चार हत्तींचा मृत्यू

भुवनेश्‍वर : झारसुगीडा जिल्ह्यातील तेलीदिही गावाजवळ सोमवारी पहाटे एका मालगाडीने धडक दिल्याने चार हत्तींचा मृत्यू झाला. तेलीदीही गावाच्या रेल्वे क्रॉसिंग जवळ दुहेरी-क्रा ॅसिंग पट्ट्यांवर हावडा-मुंबई एक्स्प्रेसने या रुळावरून चालणार्‍या हत्तींना धडक दिली. यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेत तीन हत्तींसह त्यांच्या एका पिल्लाचाही समावेश आहे. या घटनेनंतर काही काळ या मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. वन अधिकार्‍यांच्या अथक प्रयत्नानंतर क्रेनच्या सहाय्याने या प्राण्यांचे मृतदेह रेल्वे मार्गावरून हटवण्यात आले.