Breaking News

क्रांतिसेना संयुक्त बैठकीत पदाधिकार्‍यांच्या निवडी

कुळधरण: श्रीगोंदा व कर्जत तालुक्यातील क्रांतिसेना पदाधिकारी यांची संयुक्त बैठक श्रीगोंदा येथे पार पडली. यामध्ये शेतकर्‍यांच्या विविध प्रश्‍नावर तसेच दोन्ही तालुक्यात पक्ष संघटन मजबूत करण्यावर चर्चा करण्यात आली. यावेळी कर्जत युवक तालुकाध्यक्ष अक्षय मांडगे यांची आसाम रायफलमध्ये निवड झाल्याबद्दल त्यांचा क्रांतिसेनेच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी नवीन पदाधिकार्‍यांच्या निवडी करण्यात आल्या.ज्येष्ठ मार्गदर्शक साहेबराव जाधव यांची दक्षिण अहमदनगर कायदेशीर सल्लागारपदी निवड करण्यात आली. श्रीगोंदा तालुका शेतकरी अध्यक्ष वैभव जाधव यांची अहमदनगर दक्षिण जिल्हा संपर्क प्रमुख शेतकरी आघाडीपदी निवड करण्यात आली. श्रीगोंदा तालुकाध्यक्षपदी संदीप डेबरे, कर्जत तालुका युवकाध्यक्षपदी साजन शेख, श्रीगोंदा तालुका संपर्क प्रमुख पदी समीर शिंदे, श्रीगोंदा तालुका कायदेशीर सल्लागारपदी आनंद धस, कर्जत तालुका कायदेशीर सल्लागारपदी अक्षय मांडगे; श्रीगोंदा तालुका युवकाध्यक्षपदी विकास म्हस्के आदींच्या निवडी करण्यात आल्या. या निवडी दक्षिण अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष अविनाश कुरूमकर आणि जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष दरेकर यांनी जाहीर केल्या.अक्षय मांडगे यांना आणि नवीन जाहीर करण्यात आलेल्या कार्यकारणीला क्रांतिसेनेच्या संस्थापिका माजी महसूलमंत्री डॉ. शालिनीताई पाटील, प्रदेश अध्यक्ष संतोष तांबे, प्रदेश सरचिटणीस नितीन देशमुख, प्रदेश संपर्क प्रमुख मधुकर म्हसे, शिक्षक आघाडीचे अध्यक्ष भागचंद औताडे, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रतापसिंह पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष सुभाष चाटे, प्रदेश संघटक शहाजी कोळपे, पश्‍चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष संदीप ओहोळ, अहमदनगर जिल्हाध्यक्ष जालिंदर शेडगे आदींनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.