Breaking News

जामखेड दुहेरी हत्याकांड : मूख्य सूत्रधारासह आरोपींना 15 मे पर्यंत पोलिस कोठडी


जामखेड : जामखेड दुहेरी हत्याकांडाचा मूख्य सूत्रधार उल्हास माने, मूख्य आरोपी गोविंद दत्ता गायकवाड व विजय आसाराम सावंत यांना 15 मे पर्यंत पुन्हा पोलिस कोठडी देण्यात आली आहे. 


योगेश राळेभात व राकेश राळेभात यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या वरिल तीनही आरोपींना यापुर्वी 10 मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्यात आले होते. या दरम्यान चौकशीत दोन पिस्तूल व गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल पोलिसांना आरोपींकडून मिळाली आहे. काल दु. 1. 45 वा पुन्हा न्यायालयात हजर केले होते. यावेळी दुहेरी खून करण्यात वापरलेले पिस्तूल व त्याला लागणार्‍या गोळ्या आरोपींनी कोठून आणल्या याचा व फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी आरोपींना 7 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी सरकारी वकील भोकरे यांच्या मदतीने अ‍ॅड. एस एम नागरगोजे यांनी न्यायालयासमोर मांडली. त्यानुसार जामखेडचे न्यायदंडाधिकारी पी.व्ही. सपकाळ यांनी वरील तीनही आरोपींना 15 मे पर्यंत वाढवून पोलिस कोठडी सुनावली आहे.