Breaking News

23 मे रोजी पारनेर नगराध्यक्षांची निवड


पारनेर : पारनेर नगरपंचायत नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांची निवड करण्यासाठी दि. 23 मे रोजी विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. ऩगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपण्यापुर्वीच 8 दिवस अगोदर ही प्रक्रिया राबविण्यात येत असली तरी, अर्ज दाखल करण्याच्या आदल्या दिवशी म्हणजे काल रोजी नगरसेवकांना नोटीसा मिळाल्या. ऩगराध्यक्ष पद खुल्या प्रवर्गासाठी राखीव आहे.

नगराध्यक्ष पदाची निवडणुक लढविणार्‍या नगरपंचायतच्या सदस्याने आज दुपारी 2 वाजेपर्यंत पारनेर नगरपंचायतच्या मुख्याधिकारी यांचेकडे आपले उमेदवारी अर्ज सादर करावयाचे आहेत. तर उपनगराध्यक्ष पदासाठीच्या उमेदवाराने दि. 23 मे रोजी सकाळी दहा ते बारा वाजेपर्यत अर्ज सादर करावयाची मुदत आहे. नगराध्यक्ष पदासाठी दाखल झालेल्या अर्जाची दुपारी 2 वाजेपर्यंत छाननी प्रक्रिया पुर्ण केली जाणार आहे. तर उपनगराध्यक्ष पदाची छाननी दि. 23 मे रोजी सभेत केली जाणार आहे. आज नगराध्यक्ष पदाच्या छाननीत फेटाळलेल्या अर्जाची यादी प्रसिध्द केली जाणार आहे. दि.21 मे रोजी सायंकाळी 5 नंतर व ऩगराध्यक्ष पदासाठी वैध ठरलेल्या सदस्यांची यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. मंगळवार दि 22 मे रोजी नगराध्यक्ष पदासाठीच्या उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहे. या विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी श्रीगोंदा व पारनेर विभागाचे उपविभागीय अधिकारी असणार आहेत.