Breaking News

आंतरराष्ट्रीय आंबा परिषदेत 312 शास्त्रज्ञ सहभागी


सिंधुदुर्गनगरी, दि. 11, मे - वेंगुर्ले येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्रात गेल्या दोन दिवसांपासून आंतरराष्ट्रीय आंबा परिषद सुरू आहे. या परिषदेची सुरुवात मंगळवारी ‘जागतिक पातळीवरील आंब्याची सद्यस्थिती’ या विषयावरील चर्चासत्राने करण्यात आली. या सत्राचे उद्घाटन ऑस्ट्रेलियातील चार्ल डार्विन युनिव्हर्सिटीचे डॉ. पिग्लू यांच्या हस्ते झाले. या आंतरराष्ट्रीय आंबा परिषदेस देशातील 272, तर विदेशातील 40 नामवंत शास्त्रज्ञ सहभागी झाले आहेत. उद्या या परीषदेची सांगता होणार आहे.

इंटरडिसिप्लिनरी सोसायटी फॉर ऍडव्हान्समेंट आँफ ऍग्रीकल्चरल सायन्सेस ऍण्ड टेक्नॉलॉजी आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्रात आंतरराष्ट्रीय आंबा परिषदेचे आयोजन 11 मेपर्यंत करण्यात आले आहे. परिषदेचे उद्घाटन जागतिक पातळीवरील आंब्याची सद्यस्थिती या विषयावरील चर्चासत्राने करण्यात आले.

या परिषदेचे औचित्य साधून परिषदेस उपस्थित असलेले कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचे माजी विद्यार्थी व गोव्याचे कृषिमंत्री विजय सरदेसाई यांचा सत्कार डॉ. व्हिक्टर गॅलन यांच्या हस्ते क रण्यात आला. गोव्याप्रमाणेच महाराष्ट्रात कृषी पर्यटनास फार मोठा वाव आहे. गोवा व महाराष्ट्राने बरोबरीने, एकमेकांच्या सहकार्याने कृषी पर्यटनाद्वारे या भागाचा विकास साधावा. त्यासाठी गोवा राज्याचे पूर्ण सहकार्य राहील, अशी ग्वाही यावेळी विजय सरदेसाई यांनी दिली. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ हे उत्तम दर्जाचे विद्यापीठ असून तेथे मिळालेल्या ज्ञानाच्या आधारे आपण कृषिमंत्री झालो, असेही त्यांनी यावेळी सांगितले. आज जागतिक पातळीवरील आंब्याची सद्यस्थिती, वातावरणातील बदल, आनुवंशिकता व प्रजोत्पादन, अभिवृद्धी आणि नैसर्गिक स्त्राीत व्यवस्थापन या विषयावर चर्चासत्रे झाली. शाश्‍वत कृषी उत्पादन आणि कृषी तंत्रज्ञान व यांत्रिकीकरण व कृषी विषयावरील खास सादरीकरण झाले. आंब्याची जागतिक स्तरावरील सद्यस्थिती, जाग तिक स्तरावरील वातावरणातील फरक आणि त्याचा आंबा उत्पादनावर परिणाम, आंब्यातील आनुवंशिकता, आंब्याच्या शाश्‍वत उत्पादनाकरिता कृषी तंत्रज्ञान, आंबा शेतीमधील तंत्रज्ञान या विषयावरील सादरीकरण झाले. आज आंब्याची निर्यात व व्यापारीकरण या विषयावर प्रगतशिल शेतकरी व निर्यातदार डॉ. अजित शिरोडकर व डॉ. मिलिंद जोशी यांची सादरीकरणे झाली.