Breaking News

संजीवनीच्या 9 विद्यार्थ्यांची कोनक्रेन, ग्लेनमार्कमध्ये निवड


कोपरगाव : हिविंका, फिनलॅण्ड मुख्यालय असलेल्या आणि मोठमोेठ्या कंपनी, मोठी जहाजे आदींमध्ये अवजड मशिन्स, हत्यारे अशा वस्तू उंचावरून सर्व दिशांना वाहुन नेण्यासाठी क्रेन बनविणार्‍या जग विख्यात कोनक्रेन या कंपनीने संजीवनी के.बी.पी. पॉलीटेक्निकच्या चार विद्यार्थ्यांची तर विक्रोळी, मुंबई मुख्यालय असलेल्या आणि भारतासह युएसए, वेस्टर्न युरोप, द.अमेरिका आदी देशात औषधे पुरवठा करणार्‍या ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्य या औषध निर्माण कंपनीने संजीवनी पॉलीटेक्निकच्या पाच विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह अंतर्गत संस्थेच्या ट्रेनिंग अ‍ॅण्ड प्लेसमेंट विभागाच्या पुढाकारने नोकर्‍यांसाठी निवड केली असुन, संजीवनी विद्यार्थ्यांना नोकर्‍या मिळवुन देण्याच्या उद्दीष्ठ पुर्तीकडे वाटचाल करीत आहे, 

अशी माहिती प्राचार्य ए. आर. मिरीकर यांनी दिली आहे.
विद्यार्थ्यांच्या या निवडीबद्दल संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस्चे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे, प्राचार्य व ट्रेनिंग अ‍ॅण्ड प्लेसमेंट ऑफीसर प्रा. आय. के. सय्यद यांचे अभिनंदन केले.