Breaking News

लालू प्रसाद यांना सहा आठवड्यांचा जामीन

रांची : वैद्यकीय उपचारांच्या पार्श्‍वभूमीवर बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना येथील उच्च न्यायालयाने सहा आठवड्यांचा सशर्त जामीन मंजूर केला आहे. चारा घोटाळा प्रकरणी येथील बिरसा मुंडा कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या यादव यांची प्रकृती काही काळापासून खराब होती. त्यांच्यावर 1 मे पासून आरआयएमएस रुग्णालयात उपचार येथे उपचार सुरू आहेत. मागील काही काळापासून लालू प्रसाद किडनी, मधुमेह यांसारख्या विकारांनी त्रस्त आहेत. प्रकृतीच्या तक्रारीनंतर लालू यांना ’एम्स’मध्ये दाखल करण्यात आले होते. प्रकृतीतील सुधारणेनंतर दिल्लीतील ’एम्स’ रुग्णालयातून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. यापूर्वी लालू प्रसाद यादव यांना त्यांच्या मुलाच्या लग्नासाठी 3 दिवसांची सुट्टी मंजूर करण्यात आली. मात्र लग्नाच्या वेळीदेखील त्यांच्यावर सतत कॅमेराची नजर असेल, अशी माहिती बिरसा मुंडा मध्यवर्ती कारागृहाने दिली आहे.