Breaking News

प्रदूषणमुक्त नदी आराखडा तयार करण्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांचे निर्देश


मुंबई : मुंबईतील नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी ‘प्रदूषणमुक्त नदी आराखडा’ १ जून २०१८ पर्यंत तयार करण्याचे निर्देश पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी अधिकाऱ्यांना दिले.

मुंबईतील नदी प्रदूषणाबाबतची बैठक आज मंत्रालयात झाली. श्री. कदम म्हणाले, मुंबईतील मिठी नदी, ओशिवरा, दहिसर नद्यांचे प्रदूषण थांबविणे गरजेचे आहे. आजूबाजूच्या वस्त्यांमधील, कारखान्यातील दूषित पाणी सरळ नदीत सोडल्याने त्या प्रदूषित झाल्या आहेत. काही ठिकाणी कचरा, प्लास्टिक व अन्य टाकाऊ वस्तू थेट नदीत टाकल्याने नद्या अस्वच्छ झाल्या आहेत. बऱ्याच ठिकाणी नदीकाठच्या परिसरात लोकांनी अतिक्रमण करुन घरे, झोपड्या बांधल्या आहेत. अशा लोकांची यादी करुन पोलिसांना द्यावी. त्यांच्या मदतीने अतिक्रमणे तोडावीत. त्याचबरोबर सांडपाणी, रासायनिक पाणी नद्यांमध्ये सोडणाऱ्यांवरही कडक कारवाई करण्याचे निर्देश पर्यावरणमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले.