Breaking News

महात्मा फुले कृषि विद्यापीठात कर्मचारीच ठेकेदार; कुलसचिवांकडे तक्रार दाखल


राहुरी : महात्मा फुले कृषि विद्यापीठात नोकरीवर असलेल्या कर्मचार्याकडून नातेवाईकांच्या नावावर मजूर ठेकेदारीचा अवलंब करीत आहेत. विद्यापीठात हे कर्मचारी ज्या पदावर कार्यरत आहेत, त्या पदाच्या पगाराचा बोजा अनेक वर्षांपासून विद्यापीठावर पडत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर डिग्रस येथील सचिन पवार यांनी कुलसचिवांना तक्रार दिली आहे. 
पवार यांनी या तक्रारीत म्हटले आहे, की प्लंबर या पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याकडून प्लंबिगची कामे न करता नातेवाईकांच्या नावावर असलेल्या मजुर ठेकेदारीच्या परवान्यावर मोठ्या प्रमाणात मजूर पुरविण्याचे कामे सुरु आहे. अनेक मजूर विद्यापीठाचा पगार घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जवळील नातेवाईकांच्या घरी कामे करीत असल्याचे आढळून आले आहे. त्यांच्याकडील मजूर ठेकेदारीसबंधी तपासनी झाल्यास अनेक गैर प्रकार उघडकीस येतील.