Breaking News

खूनप्रकरणी फरार आरोपी जेरबंद


कोल्हार : प्रवरानगर येथील नरेंद्र राजेंद्र भोसलेचा खून करूनफरार झालेला आरोपी लाला भोसले यास लोणी पोलिसांनी संगमनेर येथे पाठलाग करून जेरबंद केले. 
राहता तालुक्यातील प्रवारानगर येथे दि. १७ तारखेला मागील वादाच्या कारणावरून नरेंद्र राजेंद्र भोसले या युवकाचा पोटात चाकू खुपसून खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या घटनेनंतर तब्बल सहा दिवसांनी नरेंद्र भोसले याचा प्रवरा रुग्णालयात उपचारादरम्यान मंगळवारी सकाळी मृत्यू झाला. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी लोणी पोलिसात ठिय्या मांडला होता. 

आरोपीस अटक होईपर्यंत मयताचे पोस्टमार्टेम न होऊ देण्यावर नातेवाईक ठाम होते. त्यामुळे लोणी पोलीसासमोर मोठा पेच निर्माण झाला होता. श्रीरामपूर, संगमनेर व लोणी पोलिसांनी आरोपीस अवघ्या २४ तासात जेरबंद करण्याची कामगिरी पार पडली.