Breaking News

बोर्ले गावात घरकुलांच्या बांधकामांचे भूमीपूजन

तालुक्यातील बोर्ले येथे घरकुलांच्या बांधकामाचे भूमीपूजन डॉ. सुजय विखे यांचे स्वीय सहाय्यक पी. एस. यादव, एम. आर. वडेकर व बोर्ले गावचे सरपंच भारत काकडे यांचेहस्ते करण्यात आले. यावेळी मिराबाई शिंदे, दत्तात्रय शिंदे, श्रीरंग डोलारे, सुभाष शिंदे, नरसिंग शिंदे आदींच्या घरकुलांच्या कामाची सुरुवात केली. तसेच उर्वरीत गावातील लाभार्थींना लवकरच निधी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालीनीताई विखे यांच्या माध्यमातून उपलब्ध करून घेण्याचे आश्‍वासन स्वीय सहाय्यक व सरपंच भारत काकडे यांनी आश्‍वासन दिले. भूमीपूजन प्रसंगी उपसरपंच कविता चव्हाण, ग्रामसेवक आर. व्ही. मोरे, मा. सरपंच उत्तम चव्हाण, एकनाथ चव्हाण, भाऊसाहेब पवार, नवनाथ काकडे, मुख्याध्यापक शिवाजी काकडे, दिलीप काकडे, किसन काकडे, सुभाष फरताडे, अर्जुन काकडे, छगन पवार, सुभाष घाडगे, मच्छिंद्र काकडे, रोजगारसेवक प्रकाश चव्हाण व ग्रामस्थ यावेळी मोठया संख्येने उपस्थित होते.