Breaking News

दरोड्याच्या तयारीतील आरोपी जेरबंद


राहाता : दरोड्याच्या तयारीत असलेल्या तीन आरोपींना राहाता पोलीसांनी अटक केली. मात्र यातील अन्य तीन आरोपी फरार झाले. आज {दि. १७} पहाटे ही घटना घडली.
यामध्ये अजय सुनिल कसबे, {रा. भेर्डापूर, ता. श्रीरामपूर}, किरण भाऊसाहेब गायकवाड, {रा. मालुंजा, ता. राहूरी}, संदिप वसंत ठोकळ, {रा. जोडमोहोज ता. पाथर्डी} या तीन आरोपींचा समावेश आहे. आज {दि. १७ } पहाटे पाचच्या सुमारास राहाता शहरानजिकच्या पंधरा नंबर चारी येथे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत रात्रीची गस्त घालीत असतांना शाळेजवळ यातील ६ आरोपी रस्त्यावर उभे राहून दुचाकी वाहन चालकांना अडवत होते. हे पोलिसांच्या लक्षात येताच तात्काळ तीन आरोपींना पकडण्यात आले. अन्य तीन आरोपी पोलिसांच्या तावडीतून निसटले. या आरोपींकडून पोलीसांनी हिरोहोंडा कंपनीची पॅशन ही दुचाकी व गज ताब्यात घेतले.