Breaking News

काळे-कोल्हे गटाच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष


कोपरगाव : तालुक्यातील लौकी, दहेगाव बोलका, घोयेगाव, चांदगव्हान, कारवाडी मुर्शतपुर, सुरेगाव, मंजुर, शहाजपूर या नऊ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत अनुचित प्रकार न होता शांततेत मतदान झाले. दरम्यान, उद्या मतमोजणी होणार असून त्यांनतर जाहीर होत असलेल्या निकालात काळे आणि कोल्हे गटापैकी कोणाची सरशी होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 
या नऊ गावांच्या निवडणुकीसह एका ग्रामपंचायतीच्या पोटनिवणुकीत सरपंचपदासाठी २५ तर ७८ सदस्यपदासाठी १६५ उमेदवार रिंगणात होते. आज { दि. २७ } सकाळी साडेसात वाजता मतदान सुरु झाले. दुपारी उन्हाची तीव्रता जास्त असल्याने मतदार घराबाहेर पडत नव्हते. त्यामुळे उमेदवारांच्या चेहऱ्यावर चिंता दिसत होती.

मतदान आकडेवारी {टक्केवारीत}सुरेगाव- ६९. ९५, दहेगाव बोलका- ८३. ४५, मूर्शतपूर- ८२. ०६, लौकी- ९०. ४४, मंजूर- ८५. ७४, घोयगाव- ९५. ४४, चांदगव्हाण ९५. ४४, कारवाडी ८५. २४, शहाजापूर- ८५.०८, काकडी मल्हारवाडी- ८८. २५. एकूण मतदानाची टक्केवारी ८०. ०५.