Breaking News

ईव्हीएममध्ये बिघाडीच्या तक्रारी !विविध पक्षांची फेरमतदान घेण्याची मागणी ; गोसेखुर्द प्रकल्पबाधित काही गावांचा मतदानांवर बहिष्कार

नवी दिल्ली : महाराष्ट्रासह देशभरातील 10 राज्यामध्ये 4 लोकसभा आणि 10 जागांसाठी सोमवारी मतदान झाले, मात्र विविध ठिकाणहून ईव्हीएम मशीनमध्ये बिघाडाच्या तक्रारी क रण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातील पालघर आणि भंडारा-गोदिंयासह देशातील अन्य मतदान केंद्रांवर मतदान यंत्रात बिघाडाच्या तक्रारी समोर आल्या आहेत. 

उत्तरप्रदेशातील कैराना लोकसभा पोटनिवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात बिघाडाच्या तक्रारी समोर येत आहेत. विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी निवडणूक आयोगाचे दरवाजे ठोठावले असून फेरमतदानाची मागणी केली आहे. तसेच ज्या मतदान केंद्रावर मतदान प्रक्रियेस व्यत्यय आला असेल, त्याठिकाणी मतदानाची वेळ वाढवून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
30 टक्के ईव्हीएम सदोष असल्याचे सांगत माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी यावर आक्षेप नोंदवला. भंडारा-गोंदिया जिल्ह्यात लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान प्र क्रियेदरम्यान अनेक ठिकाणी ईव्हीएम बंद पडल्याच्या घटना समोर येत आहे. दुपारी 1 वाजेपर्यंत केवळ 22 टक्के मतदान झाले होते. ग्रामीण भागातील लोक मतदानाविषयी उत्सुक दिसत आहेत. पण, दुपारी सव्वाबारा वाजेपर्यंत केवळ 7 टक्के मतदान झाले आहे. अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद असल्याचा अनेक घटना समोर येत आहेत. तर, गोंदिया शहरात 4 ठिकाणी मशीनमध्ये बिघाड झाल्यामुळे या ठिकाणी मतदान थांबविण्यात आले आहे. 
इलेक्ट्रीक वोटींग मशिन या बर्‍याच ठिकाणी बंद पडल्या आहेत. त्यामुळे कुठेतरी नागरिकांना त्रास होत होता. या मशिन उष्णतेमुळे हीट होत असल्याचे अधिकारी बोलत आहेत. मशीन तंत्रज्ञाला पाठवून मशिन दुरुस्त करण्याचे काम अनेकठिकाणी सुरू होते. मात्र, या निवडणुकीत भंडारा-गोंदिया जिल्ह्यात 100 च्या वर मतदान केंद्रावरील मशिन बिघाड झाल्याचे चित्र पाहायला मिळत होते. गोसेखुर्द प्रकल्पबाधित काही गावांनी या मतदानावर बहिष्कार टाकला आहे. एकंदरीतच गोसेखुर्द प्रकल्प तयार झाला असला तरी काही गावातील लोकांचे पुर्नवसन आणि त्यांच्या मुलभुत सुविधांचा प्रश्‍न तसाच आहे. गावकर्‍यांनी वारंवार मोर्चे आंदोलने करत निवेदन दिले. मात्र, या गावकर्‍यांना आश्‍वासनाशिवाय क ाहीही मिळाले नाही. त्यामुळे आज होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीवर काही गावांनी बहिष्कार टाकला आहे. 
देशभरातील पोटनिवडणुकांना गांभिर्याने पाहिले जात असून, सोमवारी महाराष्ट्रासह देशभरातील 10 राज्यांमध्ये 4 लोकसभा आणि 10 विधानसभा जागांचा कौल मतदानयंत्रात बंद झाला. उत्तर प्रदेशमधील कैराना, महाराष्ट्रातील भंडारा-गोंदिया आणि पालघर आणि नागालँड मतदारसंघात लोकसभेसाठी पोटनिवडणुकासाठी मतदान पार पडले. तर विधानसभेसाठी बिहारमधील जोकिहाट, झारखंडमधील गोमिया व सिल्ली, केरळमधील चेंगन्नूर, उत्तर प्रदेशमधील नूरपूर, उत्तराखंडमधील थराली, महाराष्ट्रात पलूस काडेगाव, मेघालयात अमपती, पंजाबमध्ये शाहकोट आणि पश्‍चिम बंगालमध्ये महेश्तला येथे पोटनिवडणूक होत आहे. उत्तर प्रदेशमधील कैराना येथे लोकसभेच्या एका जागेसाठी तर नूपूर येथे विधानसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूकीसाठी मतदान संपन्न झाले आहे. 
भंडारा-गोंदिया जिल्ह्यात कुठेही मतदान बंद नाही. काही मशीन बंंद होत्या. त्या दुरुस्त केल्या असून, आता मतदान सुरळीत सुरू आहे. जोपर्यंत शेवटचा मतदाता मतदान करणार नाही, तोपर्यंत मतदान सुरूच राहील. तसेच गोंदिया जिल्ह्यातील 35 मतदान केंद्रावरील मतदान रद्द नाही. 
अभिमन्यू काळे (जिल्हाधिकारी ) 
भंडारा-गोंदियात इव्हीएम बंद ; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
भंडारा-गोंदिया येथिल लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरु आहे. मात्र, येथिल अनेक मतदार केंद्रांवर इव्हीएम बंद असल्याने गोंधळ निर्माण झाला आहे. येथे 450 मतदान यंत्रे बंद असून ही यंत्रे निवडणूक आयोग आणि सरकारने जाणीवपूर्वक कारस्थान करीत बंद केल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. तसेच गोंधळामुळे भंडारा-गोंदियात फेरनिवडणूक घेण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.