Breaking News

तामिळनाडूतील आंदोलनात आणखी एकाचा मृत्यू

चेन्नई - धातू शुद्धीकरण प्रकल्पाला विरोध दर्शवण्यासाठी करण्यात आलेल्या आंदोलनात आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाली असून बळींची संख्या आता 12 झाली आहे. तामिळनाडूतील तुतीकोरीन येथील टूथूकूडी येथील वेदांत धातू शुद्धीकरण प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध आहे. दगडफेक, शासकीय वाहने व मालमत्तेची जाळपोळ करत हा प्रकल्प बंद करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. या प्रकल्पामुळे होणार असलेल्या प्रदूषणाने गंभीर आजार उद्भवण्याची शक्यता येथील स्थानिकांनी वर्तवली आहे. दरम्यान 12 लोकांच्या मृत्यूप्रकरणी केंद्र सरकारने तामिळनाडूकडून अहवाल मागवला आहे.