Breaking News

अभिनेत्री मिनाक्षी थापा हत्याकांड : दोषींना तिहेरी जन्मठेपेची शिक्षा

मुंबई - नेपाळी चित्रपट अभिनेत्री मिनाक्षी थापा हत्याकांडातील दोन्ही दोषींना शुक्रवारी मुंबई सत्र न्यायालयाने तिहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. बॉलिवूडमध्ये जूनियर आर्टिस्ट म्हणून काम करणारी नेपाळी अभिनेत्री मिनाक्षी थापा हिची हत्या सन 2012 मध्ये प्रिती सुरिन आणि अमित जयस्वाल या दोघांनी घडवून आणली होती.
मिनाक्षी थापाचे शीर धडापासून वेगळे करत तिचा खून करण्यात आला होता. बॉलिवूडमधील दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्या ’हिरोईन’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान मृत मिनाक्षीची आरोपी प्रीती सुरीम आणि अमित जयस्वाल यांच्याशी मैत्री झाली होती. भोजपुरी चित्रपटात काम देण्याच्या बहाण्याने मिनाक्षीला आरोपींनी गोरखपूर येथे नेले. नंतर आरोपींनी मिनाक्षीच्या आईला फोन करून 15 लाख रुपयांची खंडणी मागितली होती. मिनाक्षीच्या आईने केवळ 60 हजार रुपये दिले होते. आरोपींनी खंडणी न मिळाल्याने मिनाक्षीची हत्या केली. मिनाक्षीचे धड शरीरापासून वेगळे करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्नही आरोपींनी केला होता.