Breaking News

प्रहार संघटनेच्या वतीने अंबिजळगाव ग्रामपंचायतीस टाळे


कर्जत : तालुक्यातील अंबिजळगांव येथे प्रहार संघटनेने अंबिजळगाव ते खातगांव शिव रत्यासाठी 15 नोव्हें 2017 रोजी लेखी निवेदन देवुनही आजपर्यंत कसल्याही प्रकारची दखल घेतली नसल्याने, संघटनेच्या व ग्रामस्तांच्या वतीने ग्रामपंचायतीस टाळे ठोकले. या रस्त्यावरून वृद्ध, शाळेतील विद्यार्थ्यांना येण्याजाण्यासाठी कसरत करुन अडचणीवर मात करत जावे लागत आहे.रस्त्याच्या बाजूस असणारे अतिक्रमण ग्रामपंचायतीनेच बाजूला केले पाहीजे अशी चर्चा ग्रामस्तांमधुन होत आहे. 

त्यातच रस्त्याच्या कडेस दुतर्फा शेतकर्‍यांनी अतिक्रमण केल्यामुळे हा विषय अधिक गंभीर बनला आहे. यावेळी प्रहार संघटनेचे तालुका युवक अध्यक्ष सागर निकत, अहमदनगर जिल्हा अध्यक्षा प्रहार संघटनेच्या महीला आघाडीच्या विमल अनारसे, प्रहार संघटनेचे कर्जत तालुका कार्याध्यक्ष सुदाम निकत, डॉ. पाटिल, ग्रामपंचायत सदस्य किशोर निकत, तुकाराम अनारसे, धनंजय निकत, बिभिषन अनारसे, ज्ञानेश्‍वर शिंदे, जाकिर शेख, गोरख निकत, मनोज निकत, संतोष निकत, ग्रामसेवक घोडेस्वार, सरपंच लोचना अनारसे यांचेसह गावकरी उपस्थित होते.