Breaking News

मुलीच्या लग्नपत्रिका वाटताना पित्याचा अपघाती मृत्यू

नागपूर : मुलीच्या लग्नाची पत्रिका वाटण्यासाठी निघालेल्या ६३ वर्षांच्या पित्याचा अज्ञात वाहनाने दिलेल्या जबर धडकेत उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी फरार अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अब्दुल रशीद खान करीम खान (रा. ताजनगर टेका), असे मृताचे नाव आहे. १५ एप्रिल रोजी सकाळी दहा ते साडेदहाच्या दरम्यान अब्दुल त्यांच्या ॲक्टिव्हा दुचाकीने पत्रिका वाटण्यास निघाले होते. मेहंदी बाग पुलाच्या कॉर्नरजवळ अज्ञात वाहनाने त्यांना जबर धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. .