Breaking News

प्रेस क्लबच्या वतीने शहर स्थापना दिना निमित्त कार्यक्रमाचे आयोजन


अहमदनगर - शहराच्या 528 व्या स्थापना दिना निमित्त सोमवार दि.28 मे रोजी प्रेस क्लबच्या वतीने शहराचे संस्थापक अहमद निजामशहा यांच्या कबर स्थळी बागरोजा येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 10 वा. मान्यवरांच्या हस्ते अहमद निजामशहा यांच्या कबरीवर चादर अर्पण करण्यात येणार असल्याची माहिती प्रेस क्लबचे अध्यक्ष मन्सूर शेख यांनी दिली. 

दरवर्षी प्रमाणे या वर्षीही प्रेस क्लबच्या वतीने या ऐतिहासिक स्थळी स्थापना दिना निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. पाचशे वर्षाचा एतिहासिक वारसा लाभलेल्या अहमदनगर शहराचा इतिहास नागरिकांना ज्ञात व्हावा या उद्देशाने हा कार्यक्रम घेतला जातो. यावेळी शहराच्या इतिहासाची माहिती नागरिकांना दिली जाते. या कार्यक्रमात इतिहास प्रेमी, नागरिक व समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती सहभागी होत असतात. तरी या कार्यक्रमासाठी नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन प्रेस क्लबच्या वतीने करण्यात आले आहे.