Breaking News

बिबट्याला विहिरीबाहेर काढण्यात यश


राहुरी विशेष प्रतिनिधी : तालुक्यातील तांभेरेच्या मध्यवर्ती असलेल्याकापूरआई मंदिराशेजारील एका विहिरीत पडलेल्या सात महिन्याच्या बिबट्याला सुखरूपणे विहिरीच्या बाहेर काढण्यात आले. 
वनविभाग प्रमुख वाघ, गायकवाड, किनकर लांबे आदींसह पोलिस अधिकारी लक्ष्मण भोसले, नवनाथ वाघमोडे, संजय राठोड, साईनाथ टेमकर, होमगार्ड संजय भस्करे, त्रिमुर्ती क्रेनचे मालक यमनाथ आघाव आदींनीं यासाठी मोलाचे सहकार्य केले. बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती