Breaking News

लोणी ग्रामपंचायतीचा गड कोण राखणार?


श्रीगोंदा : तालुक्यातील लोणी गाव राजकीय समीकरण जुळवून देणारे गाव म्हणून ओळख आहे. मात्र या निवडणूकीमध्ये नाहाटा-नागवडे यांची युती तुटली, आता याचा फायदा पाचपुतेंना होणार का? हेदेखील आता आज लागणार्‍या निकालामध्ये दिसूनच येईल. पण या निवडणूकीमध्ये नाहाटाचे सारथ्य आमदार राहुल जगताप यांनी स्विकारले, आजच्या या निकालाने कोण किती पाण्यात आहे हेदेखील समजणार आहे. अटीतटीच्या या सामन्यात सामणावीर कोण ठरणार? नाहाटांनी आपला मुलगा मितेश यांचे चिन्ह बॅटस्मन घेतले आहे. मितेशला येथील राजकारणात फलंदाज म्हणून उतरवले असले तरी, सामानावीर होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहेे.

लोणी येथे पोलिस निरिक्षक बाजीराव पोवारसह सुमारे 50 पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. लोणी ग्रामपंचायत निवडणूकीत सर्व मतदान 5,900 इतके होते, त्यापैकी 5,067 इतके मतदान झाले असून, साधारण 84 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी निलेश वाघमारे यांनी दिली.