Breaking News

संजय कोठारी यांचेमुळे एकाचे प्राण वाचले

जामखेड - करमाळा रोडवरील चुंबळी फाट्याजवळ दुचाकी आणि ट्रॅक्टरची अपघात झाला. यामध्ये रमेश चिंतामण शिंदे (वय 30) रा. सरदवाडी ता. जामखेड हा जबर जखमी झाला. सदर घटनेची माहिती समताच सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी आपली रुग्णवाहीका घेऊन घटनास्थळी पोहचले, जखमीस स्वतः आणून त्याचे प्राण वाचवले. रमेश शिंदे दुचाकीवरून जामखेडला येत असतांना सोबत असलेले उत्तरेश्‍वर शिंदे रा. पातळी ता. जामखेड हेदेखील किरकोळ जखमी झाले आहेत. समोरुन येणार्‍या ट्रॅक्टरने धडक देवुन निघुन गेला. तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी 108 ला संपर्क साधले परंतु 108 वेळेवर न आल्याने संजय कोठारी त्या ठिकाणी जावून त्यांनी जखमींना जामखेडच्या सरकारी रूग्णालयात दाखल करून त्यांचे प्राण वाचवले. यावेळी गणेश देवकाते, नितीन सोळंकी, प्रफुल सोळंकी, विशाल नेटके आदींनी मदत केली.