Breaking News

खेडमध्ये गौतम बुद्ध जयंती साजरी

कुळधरण : प्रतिनिधी - कर्जत तालुक्यातील खेडच्या लोकनायक जयप्रकाश नारायण विद्यालयात गौतम बुद्ध यांची जयंती संपन्न झाली. प्राचार्य चंद्रकांत मोरे, वरिष्ठ लिपिक विकास कुलकर्णी यांच्या हस्ते प्रतिमापुजन झाले. यावेळी चंद्रकांत चेडे, गोरक्ष भापकर, संदीप भिसे, रूपचंद गोळे, सुनिल थोरात, किरण जगताप, बारिकराव शेटे आदी उपस्थित होते. गोरक्ष भापकर यांचे भाषण झाले. राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयात प्राचार्य यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी प्रा. शाहुराव पवार, लिपिक भगवान काळे, रमेश जंजिरे, माऊली जंजिरे, आबा भिसे आदी उपस्थित होते.