Breaking News

राज ठाकरे-उद्धव ठाकरेंनी एकत्र यावं, दादरच्या पुलावर तरुणाचं आंदोलन


मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं, अशी मागणी करणारी घोषणा आज दादरमधल्या एका पुलावरून ऐकू येत होती. या दोन्ही नेत्यांवर प्रेम करणारा श्याम गायकवाड हा कार्यकर्ता चक्क दादर टीटीच्या पुलावर चढून घोषणा देत होता.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही भावांनी एकत्र यावं आणि निवडणूक लढवावी, अशी मागणी या तरुणाकडून करण्यात आली. सुमारे तासभर या तरुणाने पुलावर ठाण मांडली होती अखेर तासाभराच्या ड्राम्यानंतर पोलीस आणि अग्निशमनदलाची गाडी आली. मग भल्या मोठ्या शिडीद्वारे अग्निशमन जवान त्याच्याजवळ पोहोचले आणि त्याला खाली उतरवलं. यावेळी त्याने राज आणि उद्धव ठाकरेंच्या एकीची मागणी करणारी पत्रकेही वाटली आणि अखेर त्याला पोलिसांनी अटकही केली.