Breaking News

कर्नाटकात आज मतदान

कर्नाटक विधानसभेच्या २२३ जागांसाठी शनिवारी मतदान प्रक्रिया पार पडणार असून, १५ मे रोजी मतमोजणी होणार आहे. तीन महिन्यांहून अधिक काळ रंगलेल्या प्रचाराच्या रणधुमळीनंतर राज्यात तिरंगी लढती होत असून या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस आणि प्रमुख विरोधी पक्ष असलेला भाजप हे सत्ता स्थापनेचे प्रमुख दावेदार असले, तरी माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचा जनता दल सेक्युलर पक्ष किंगमेकरची भूमिका पार पाडेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे