Breaking News

खिर्डी गणेश शिवारात बेवारस मृतदेह


कोपरगाव : तालुक्यातील खिर्डी गणेश शिवारातील चांदरवस्ती जवळ रेल्वे लाईनच्या बाजूस अनोळखी पुरुषाचे प्रेत डोक्याला मार लागलेल्या स्थितीत आढळले.

कोपरगाव रेल्वे स्टेशन मास्तर प्रविण प्रल्हाद आहिरे यांनी कोपरगाव तालुका पोलिस स्टेशनला दिलेल्या माहिती वरुन खिर्डी गणेश शिवारात रेल्वे लाईनच्या कडेल पांढरा नेहरू शर्ट, पांढरे धोतर, सावळा रंग, उंची 5 फुट 5 इंच, चेहरा उभट 60-62 वय असलेल्या अनोळखी पुरुषाचे प्रेत काल सकाळी 9.30 वाजेदरम्यान दिसून आले. कोपरगाव पोलिस स्टेशन ला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सदरील सदरील वर्णनाची व्यक्ती ओळखीची असल्यास कोपरगाव पोलिस स्टेशनशी संपर्क साधावा.