Breaking News

कर्नाटकचे आमदार सिद्दू न्यामागौडा यांचा अपघाती मृत्यू

हुबळी - काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार सिद्दू न्यामागौडा यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. बंगळुरूजवळ तुलसीगेरी गावाजवळ सोमवारी पहाटे हा अपघात झाला. न्यामागौडा गोव्यावरुन त्यांच्या जामखंडी या मतदारसंघात जात होते. ते प्रवास करत असलेल्या इनोवा कारचे डावे टायर बर्स्ट झाले आणि गाडी एका भिंतीवर आदळून अपघात झाला. त्यात न्यामागौडा यांचा मृत्यू झाला. केंद्रीय मंत्रीमंडळात त्यांनी खाणमंत्रालय सांभाळले आहे. कर्नाटक काँग्रेसनी न्यामागौडा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. या कठीण क ाळता पक्ष त्यांच्यासोबत असल्याचे काँग्रेसने ट्विटरद्वारे सांगितले.

न्यामगौडा हे कर्नाटक विधानसभेत पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून गेले होते. त्यांनी भाजप उमेदवार श्रीकांत सुबराव कुलकर्णी यांचा 2,795 मतांनी पराभूत केलं होतं. याआधी 1990-91 मध्ये सिद्धू न्यामगौरा हे बगलकोट लोकसभा मतदारसंघातून खासदार होते. पी व्ही नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडे कोळसा मंत्रालयचा पदभार होता. सिद्धू यांच्या निधनानंतर काँग्रेस आमदारांची संख्या कमी होऊन 77 झाली आहे. तर कर्नाटकच्या 224 पैकी 222 जागांचे निकाल आले होते. या दोन जागांवर निवडणूक झाली नाही, तर आता सिद्धू न्यामगौडा यांच्या मृत्यूनंतर कर्नाटक विधानसभेत एकूण तीन जागा रिकाम्या झाल्या आहेत.