Breaking News

राज्याने दोन देदीप्यमान रत्ने गमावली - राज्यपाल


मुंबई : राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी प्रसिद्ध वारली चित्रकार जिवा सोमा म्हसे आणि लावणी सम्राज्ञी यमुनाबाई वाईकर यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांच्या निधनामुळे राज्याने आज दोन देदीप्यमान रत्ने गमावली आहेत, अशा शब्दात राज्यपालांनी आपली भावना व्यक्त केली आहे.

पद्मश्री जिवा सोमा म्हसे यांनी आपल्या सुबक चित्रांमधून आदिवासी समाजाचे जीवन व चालीरिती जगापुढे आणल्या. एका समृद्ध परंपरेच्या माध्यमातून प्राप्त झालेले वारली चित्रकलेचे ज्ञान त्यांनी आपल्या अंगभूत प्रतिभेने आणि प्रयोगशीलतेने वृद्धिंगत केले. जिवा सोमा म्हसे वारली चित्रकलेचे चालते बोलते विद्यापीठच होते. त्यांची कला जतन करणे आणि पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.