Breaking News

नान्नजमध्ये भूरट्या चोरांचा धुमाकूळ


जामखेड: तालुक्यातील नान्नज येेथील रहिवाशी हनुमान रामदास मोहळकर यांच्या राहत्या घराच्या ग्रीलचे कुलूप तोडून अज्ञात चोरटयांनी आत प्रवेश करून घरात उचकापचक करून रोख रक्कम दोन हजार रूपये तसेच सोन्याचे दागिने असे मिळून एकून 31 हजार रूपयांचा ऐवज चोरटयांनी चोरून पोबारा केला. याबाबत जामखेड पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. जामखेड तालुक्यातच या घटना वारंवार कसे काय घडतात? पोलिसांनी लक्ष देऊन हे कोण करत आहे? याचा छडा चोरांचा बंदोबस्त करायला पाहिजे या अगोदर नान्नजला पंडित सोनार यांच्यायेथे दोनदा दरोडा पडला पाच सहा महिण्यांपुर्वी शेतकर्‍यांच्या शेतातील पाण्याच्या मोटार चोरीला गेले आहेत.

याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, हनुमान मोहळकर यांच्या घरी चोरट्यांनी काल 2.45 वाजता त्यांच्या राहत्या घरी घराच्या लोखंडी ग्रीलचे कुलूप तोडून आत प्रवेश केला, व रोख रक्कम 2 हजारासह दागिने मिळून 31 हजारांचा ऐवज घेवून तेथून पसार झाले. हनुमान मोहळकर बोलताना म्हणाला की आम्ही स्लॅबवर झोपलो होतो, अचानक जाग आल्याने स्लॅबवरून खाली उतरत असताना चोरटयानी त्यांच्या दिशेने त्यांना दगड फिरकवल्याने लगेच त्यांनी आरडाओरड केल्यानंतर चोरटे लगेच तेथून पसार झाले. 

याबाबत जामखेड पोलिसांत माहिती दिली असता पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार, यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. विठ्ठल चव्हाण, गहिनीनाथ यादव यांनी पहाटे 5 वाजता नान्नज येथे त्यांच्या घरी भेट देऊन पाहणी करून पंचनामा केला. जामखेड तालुक्यात अशा वारंवार वेगवेगळ्या पद्धतीच्या घटना घडत आहेत, अशा भुरट्या चोरांचा व गुन्हेगारीचा पोलीसांनी बंदोबस्त करावयास हवा. जामखेड येथे नव्याने रूजू झालेले पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी नान्नजसह तालुक्यात लक्ष देऊन गुन्हेगार व भुरटे चोरांचा बंदोबस्त करावा तसेच नान्नज पोलिस दूरक्षेत्र आहे त्या ठिकाणी कायमस्वरूपी पोलिस कर्मचारी ठेवावेत अशी नान्नजच्या नागरिकांनी मागणी केली आहे.