Breaking News

गणेश भांड यांना आदर्श उद्योजक पुरस्कार प्रदान


राहुरी : महाराष्ट्र पत्रकार संघाच्यावतीने देवळाली प्रवरा येथील चैतन्य उद्योग समुहाचे अध्यक्ष गणेश भांड यांना आदर्श उद्योजक पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र पत्रकार संघाच्यावतीने श्रीरामपूर तालुक्यातील वळद उंबरगाव येथील लक्ष्मी टुरिझम येथे समाजात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन ग़ौरविण्यात आले. देवळाली प्रवरा येथील गणेश भांड यांनी चैतन्य उद्योग समुहाच्या माध्यमातून अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला. शेतकरी व कष्टकरी वर्गाला न्याय मिळवून दिल्याने त्यांच्या कार्याची दखल घेत ' आदर्श उद्योजक पुरस्कार देऊन भांड यांना गौरविण्यात आले.
महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्य अध्यक्ष विलास कोळेकर, आनंद जाधव, देवीदास बैरागी, शिवाजीराव कपाळे, अशोक दुशिंग पोलिस निरीक्षक संपत शिंदे, जिल्हाध्यक्ष दत्ता खेमनर, जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र उंडे, राहुरी तालुकाध्यक्ष राजेंद्र साळवे, राजेंद्र बनकर, रामनाथ जरहाड, बाळासाहेब खांदे, राजेंद्र लोंढे, पत्रकार रफिक शेख, वैभव गिरमे, नीलेश कराळे, विलास निर्मळ, तानाजी गवारे, यशंवत फोफसे, प्रविण फोफसे, गौरव भांड, सौरभ घोलप आदी यावेळी उपस्थित होते. पुरस्कार मिळाल्याबद्दल भांड यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.