Breaking News

‘शॅम्प्रो’च्या अध्यक्षपदी कातोरे; सोनवणे ‘राजहंस’चे अध्यक्ष


संगमनेर : माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या सहकारातील शॅम्प्रो संस्थेच्या अध्यक्षपदी जि. प.सदस्य रामहरी कातोरे यांची तर राजहंस ट्रान्सपोर्ट कंपनीच्या अध्यक्षपदी हौशीराम सोनवणे यांची निवड झाली.
सहकारमहर्षी स्व. भाऊसाहेब थोरात यांच्या तत्व व विचारांवर आणि माजी महसूलमंत्री आ. थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली या संस्था सहकाराचे मॉडेल ठरल्या आहेत. अमृत उद्योग समुहातील शेतकर्‍यांसाठी विविध शेतीउपयोगी साहित्य पुरवणार्‍या शॅम्प्रो संस्थेच्या कारभाराविषयी संपूर्ण जिल्ह्यात नावलौकिक आहे. दरम्यान, या निवडीबरोबरच ‘शॅम्प्रो’त भिमाजी राहिंज, तान्हाजी आहेर, वसंतराव साबळे, भारत वर्पे, अरुण ताजणे, डी. एम. लांडगे, शांताराम डुबे, सुभाष सांगळे, यांची तर राजहंस ट्रान्सपोर्ट कंपनीच्या संचालकपदी अण्णासाहेब थोरात, विलास नवले, अमोल वाकचौरे, सोमनाथ गुंजाळ, संभाजी वाकचौरे, बाळासाहेब खर्डे, बाबासाहेब तांबे यांची निवड झाली आहे.

या नूतन पदाधिकार्‍यांचा आ. बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बाजीराव खेमनर, अ‍ॅड. माधवराव कानवडे, बाबा ओहोळ, पांडुरंग कोकणे, बाळकृष्ण दातीर, निशा कोकणे, बाबा ओहोळ, थोरात कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, शॅम्प्रोचे मॅनेजर गोडगे तसेच राजहंस ट्रान्सपोर्ट कंपनीचे मॅनेंजर शिंदे आदी उपस्थित होते. सर्वच नूतन पदाधिकार्‍यांचे आ. बाळासाहेब थोरात, आ. डॉ. सुधीर तांबे, बाजीराव खेमनर, अ‍ॅड. माधवराव कानवडे, नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, रणजितसिंह देशमुख, सत्यजित तांबे, शिवाजीराव थोरात, अमित पंडीत, इंद्रजित थोरात, रामदास वाघ, निशा कोकणे आदींनी अभिनंदन करून भावी वाटचालीसाठी अभिनंदन केले.