Breaking News

एनआरएचएमच्या कंत्राटी कर्मचार्‍यांचे पुन्हा काम बंद आंदोलन


नगर । प्रतिनिधी - राज्याच्या आरोग्य विभागाने आश्वासन देऊनही कंत्राटी कर्मचार्‍यांच्या मागण्यांबाबत निर्धारित वेळेत पावले न उचलल्याने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघाने पुन्हा एकदा काम बंद आंदोलन सुरू केले आहे. या अभियानात कार्यरत असलेले कंत्राटी अधिकारी, कर्मचारी यांचे शिक्षण व अनुभवाच्या आधारे नियमित शासन सेवेमध्ये समायोजन करण्याची मागणी महासंघाने केली आहे. याआधी केलेल्या आंदोलनावेळी राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्यानंतर संघटनेने काम बंद मागे घेतले होते. परंतु, या आश्वासनानुसार प्रत्यक्ष कार्यवाही न झाल्याने संघटनेने मंगळवारपासून पुन्हा काम बंद आंदोलन सुरू केले आहे. नगर जिल्ह्यातील कर्मचार्‍यांनीही यात सहभाग घेत जिल्हा परिषदेच्या आवारात ठिय्या दिला आहे. नगरमधील आंदोलनात जिल्हा अध्यक्ष किरण शिंदे, उपाध्यक्ष दत्ता धावणे, सचिव संदीप गाढवे, सत्यप्रकाश दहिफळे, बापू बराटे, धनश्री जोशी, चारुशीला हिरे, बाबा देवकर, जितेंद्र करेशिया, विजय साठे, संदीप बोरूडे, प्रीति गाडगे आदी सहभागी झाले.नगर । प्रतिनिधी - राज्याच्या आरोग्य विभागाने आश्वासन देऊनही कंत्राटी कर्मचार्‍यांच्या मागण्यांबाबत निर्धारित वेळेत पावले न उचलल्याने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघाने पुन्हा एकदा काम बंद आंदोलन सुरू केले आहे. या अभियानात कार्यरत असलेले कंत्राटी अधिकारी, कर्मचारी यांचे शिक्षण व अनुभवाच्या आधारे नियमित शासन सेवेमध्ये समायोजन करण्याची मागणी महासंघाने केली आहे. याआधी केलेल्या आंदोलनावेळी राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्यानंतर संघटनेने काम बंद मागे घेतले होते. परंतु, या आश्वासनानुसार प्रत्यक्ष कार्यवाही न झाल्याने संघटनेने मंगळवारपासून पुन्हा काम बंद आंदोलन सुरू केले आहे. नगर जिल्ह्यातील कर्मचार्‍यांनीही यात सहभाग घेत जिल्हा परिषदेच्या आवारात ठिय्या दिला आहे. नगरमधील आंदोलनात जिल्हा अध्यक्ष किरण शिंदे, उपाध्यक्ष दत्ता धावणे, सचिव संदीप गाढवे, सत्यप्रकाश दहिफळे, बापू बराटे, धनश्री जोशी, चारुशीला हिरे, बाबा देवकर, जितेंद्र करेशिया, विजय साठे, संदीप बोरूडे, प्रीति गाडगे आदी सहभागी झाले.