Breaking News

पत्नीच्या चारित्र्यावर शिंंतोडे उडवल्याचा जाब विचारल्याने पतीला बेदम मारहाण


कल्याण, दि. 13, मे - पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतल्याने पतीने जाब विचारणार्‍या पतीलाच एका इसमाने आपल्या भावा व मुलाच्या मदतीने बेदम मारहाण केल्याची घटना कल्याणमध्ये घडली. याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात राजू इस्माईल त्याचा भाऊ चंदू व मुला विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

कल्याण पश्‍चिमेकडील आरटीओ परिसरात नवनाथ नगर चाळीत राहणारा संतोष जाधव याला राजू उर्फ इस्माईल याने तुझी पत्नी वाईट चारित्र्याची असे सांगितले. त्यामुळे संतोषने इस्माईलला जाब विचारला. त्यामुळे संतापलेल्या इस्माईलने संतोषला शिवीगाळ करत त्याच्या तोंडावर बोथट हत्याराने हल्ला केला. तसेच इसम, इस्माईलचा भाऊ चंदू व त्याच्या मुलानेही लाकडी स्टंप, लाथाबुक्क् यांनी बेदम मारहाण केली. याप्रकरणी संतोषने महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून या तक्रारीनुसार पोलिसांनी राजू उर्फ इस्माईल, त्याचा भाऊ चंदू व त्याच्या मुला विरोधात गुन्हा दाखल केला आहे.