Breaking News

श्रीमद् भागवत व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन


अहमदनगर : अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद भागवत कथेचे आळंदी (अलंकापुरी) येथे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती डॉ. विकासानंद महाराज मिसाळ यांनी दिली. नगरमधील आयोजित अध्यात्मिक कार्यक्रमात ते बोलत होते. दि.19 ते 26 मे दरम्यान आळंदी येथील ज्ञानेश्‍वर महाराजांच्या मंदिरामध्ये या सप्ताहाचे आयोजन केले असून भाविकांसाठी मोफत भोजन व निवासाची व्यवस्था करण्यात आली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

दैनंदिन कार्यक्रमामध्ये पहाटे काकडा भजन, बहिणाबाई गाथा पारायण, श्रीमद भागवत कथा, अलंकापुरी प्रदक्षिणा व हरिपाठ, महाराष्ट्रातील ज्येष्ठ कीर्तनकारांचे कीर्तन आदी कार्यक्रम असणार आहेत. या सप्ताहादरम्यान ह.भ.प. छगन महाराज मालुसरे, ह.भ.प. नारायण महाराज जाधव, ह.भ.प. मारुती महाराज कुर्हेकर, ह.भ.प. पांडुरंग महाराज घुले, ह.भ.प. किसान महाराज साखरे, ह.भ.प. मारुती महाराज तुणतुणे, ह.भ.प. निवृत्ती महाराज वक्ते यांची कीर्तनरूपी सेवा होणार असून ह.भ.प. डॉ. विकासानंद महाराज मिसाळ यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. मागील महिन्यात श्री.क्षेत्र काशी याठिकाणी मिसाळ महाराज लिखित संत तुकाराम महाराज चरित्र ग्रंथाचे प्रकाशन झाले आहे.

जिल्हाभरातील सर्व भाविकांनी या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. कार्यक्रम यशस्वीततेसाठी ह.भ.प. संजय महापुरे महाराज, ह.भ.प.राजेंद्र कुर्‍हे महाराज, ह.भ.प. शाम नाणेकर महाराज आदी परिश्रम घेत आहेत.