Breaking News

अध्यात्म हे ज्ञान क्षेत्र आहे धार्मिक हे कर्मकांड क्षेत्र आहे - रमेश वाकणीस


पुणे - विश्‍वाची निर्मिती कशी झाली याचे रहस्य उलगडण्याच्या प्रयत्न ऋषीमुनींनी केला आहे. वैज्ञानिक अजून या गोष्टीचा शोध घेत आहेत. अध्यात्म हे ज्ञान क्षेत्र आहे धार्मिक हे क र्मकांड क्षेत्र आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक रमेश वाकणीस यांनी निगडी येथे व्यक्त केले. 

निगडी येथे विदर्भ सहयोग मंडळाच्यावतीने मधुश्री व्याख्यानमालेचे आयोजन या कालावधीत करण्यात आले आहे. तीन दिवसीय चालणा-या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प शोधा म्हणजे सापडेल या विषयावर रमेश वाकणीस यांनी गुंफले. त्यावेळी ते बोलत होते. वाकणीस म्हणाले कि, दैनंदिन व्यवहारात आपली एखादी वस्तू हरवली कि, आपण ती शोधतो आणि सापडली की आनंद व्यक्त क रतो. आणि जर नाही सापडली तर त्याची उणीव भासते व कालांतराने त्याबद्दलची ओढ कमी होते. पण समजा आपण स्वतःचं हरवलो तर?...... अनेक वेळा ’मी कोण आहे?’ असा अनेकांना प्रश्‍न पडतो. या एका प्रश्‍नासाठी अनेक लेखकांनी लिखाण केले आहे.