Breaking News

कडूस्कर दांपत्याला सेवागौरव पुरस्कार प्रदान


संगमनेर : महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळ व राष्ट्रीय नाभिक मंडळाच्यावतीने दिला जाणारा ‘वीर हुतात्मा भाई कोतवाल सेवागौरव पुरस्कार’ येथील आधार फाउंडेशनचे संस्थापक समन्वयक विठ्ठल कडूस्कर आणि संगिता कडूस्कर या दांपत्याला नुकताच प्रदान करण्यात आला.
पुणे येथील गणेश कला क्रीडा संकुल येथे हा राज्यस्तरीय गौरव सोहळा पार पडला. याप्रसंगी आधार फाउंडेशनच्या लघुपटाचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी खा. अमर साबळे, राष्ट्रीय अध्यक्ष भगवानराव बिडवे, नंदकिशोर वर्मा, किसन मनाला, जगदीश नाईक, अभिनेते राजीव भाटिया, केश रचनाकार उदय टक्के आदी उपस्थित होते.

नाभिक समाजातील जनतेसाठी करत असलेली सेवा व संगमनेरच्या आधार फाउंडेशनतर्फे करत असलेल्या उपेक्षित, गरजू मुलांची सेवा या सामाजिक कार्याबद्दल त्यांना या पुरस्काराने गौरविले गेले. या सोहळ्यासाठी आधारचे समन्वयक डॉ. महादेव अरगडे, अनिल कडलग, सुखदेव इल्हे, तान्हाजी आंधळे, बाळासाहेब पिंगळे, सोमनाथ मदने, नामदेव सानप, गुरुकुल मंडळाच्या जिल्हाध्यक्षा वृषाली कडलग, श्रीकांत बिडवे, कुमार कोरडे, संतोष जाधव, ज्ञानदेव फड, पत्रकार बाबा जाधव, रमेश सस्कर, वसंत मदने, संजय बोऱ्हाडे, कचरू भालेकर, कृषी अधिकारी अरुण जाधव, अरुण कासार, सोपान गडाख आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान या पुरस्काराबद्दल कडूस्कर दांपत्याचे अभिनंदन होत आहे.